जिल्ह्यात सर्व समावेशक महिला बालविकास भवन उभारणार – डॉ.पद्माराणी पाटील.

हेरले /ता .१७ प्रतिनिधी

          देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.सर्व क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे . शासनाने आता त्यांना संधी देणे गरजेचे आहे. त्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसमावेशक महिला बालकल्याण भवन उभे करू असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात महिला व बालविकास भवनाचे उदघाटन जि. प.अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला व बालविकास भवनचे उद्घाटन करतांना जि प अध्यक्ष बजरंग पाटील , महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील व इतर उपस्थित मान्यवर.

    सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या, जिल्हयातील महिलांना महिला व बालविकास विभागाची सर्व माहिती,अडीअडचणीची माहिती ही एकाच छताखाली मिळावी. ह्या उद्देशाने शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.परंतू भविष्यात महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला आयोग, महिला बालविकास विभाग यांची एकत्रित इमारत म्हणून नाविन्यपूर्ण महिला बालविकास भवन बांधण्यासाठी सर्वोतोपरी कटिबद्ध राहू.

      जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील म्हणाले, ह्या भवनच्या नवीन इमारती साठी लागेल ती मदत करू. त्यासाठी येत्या सर्वसाधारण सभेत त्याच्या पुढील मंजुरीसाठी ठराव मांडून,जागेसंदर्भात ही चांगला निर्णय घ
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांसह सर्व अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

error: Content is protected !!