सांगली / प्रतिनिधी
उपविभागीय पोलीस (police) अधिकारी कार्यालय सांगली शहर, खाकी बिरादरी, 104 MY FM सांगली व ह्यूमन राइट जस्टिस असोसिएशनच्या (human rights justice association) वतीने आज रक्तदान शिबिर (blood donation) घेण्यात आले.

खाकी बिरादरी ही संस्था पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहे. कोरोना काळात रक्ताची टंचाई होती. सामान्य रुग्णाना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते . शासनाने रक्तदानाचे आवाहन केले आहे. सामाजिक बंधिलकी लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी, ह्युमन राइट जस्टिस असोसिएशन व खाकी बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित केले होते.

याप्रसंगी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच वेगवेगळ्या संस्था व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी रक्तदान केले. पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल तणपूरे , चंद्रकांत बेदरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा युवा अधिकारी नेहरू केंद्र सांगली मनिषा कोचुरे, खाकी बिरादरीचे अध्यक्ष प्रशांत पाटील , ह्युमन राईट जास्टिस असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष हनिफ डफेदार, राज्य सरचिटणीस विनोद नलावडे ,रमजान बागवान , आसिफ शिकलगार, जिल्हा अध्यक्ष अजय माने , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मनिष कुलकर्णी , सांगली जिल्हा समन्वयक दादा खामकर , सचिव इरफान पखाली , जिल्हा सरचिटणीस राजश्री सदामते, सौ . रेश्मा शेख, जिल्हा सचिव युसूफ शेख, जिल्हा संघटक सचिव अल्ताफ नदाफ, आर्जे हर्षदा व कल्याणी कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

