बॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन

मुंबई / प्रतिनिधी

   बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन झालं (Veteran Bollywood Actor-Director Tariq Shah Passes Away) आहे. शनिवारी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

  बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या सोशल मीडियावर तारिक यांच्या निधनाची बातमी दिली आहे. “दु:खद बातमी. कडवा सच टीव्ही सीरिअल आणि जनम कुंडली फिल्मचे अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं सकाळी निधन झालं. मुंबईतील खासगी रुग्णालया निधन झालं”, असं ट्वीट विरल भयानीने केलं आहे.

error: Content is protected !!