गारगोटी /प्रतिनिधी
गारगोटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना राहुल देसाई, प्रा अर्जुन आबिटकर ,प्रविणसिंह सावंत आदी
छत्रपती शिवाजी महाराजांना ३४२ व्या पुण्यदिनानिमित्त गारगोटी येथे अभिवादन करणेत आले. सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ भुदरगड तालुक्याच्यावतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ पुतळ्यास माजी जि प सदस्य राहुल देसाई व प्रा अर्जुन आबिटकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. यावेळी प्रविणसिंह सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर,सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, , मराठा महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, संग्रामसिंह पोफळे, सचिन भांदिगरे,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मचिंद्र मुगडे, प्राचार्य व्ही एस पाटील, उपअभियंता डी व्ही कुंभार, सुरेश सूर्यवंशी, आनंद चव्हाण, शिवाजी इंदुलकर, हिलगे, जितू भाट,आदी मान्यवर उपस्थित होते.