गोकुळची सभा चाळीस मिनिटात आटोपली ;सभेचे कामकाज गोंधळातच संपले

कोल्हापूर /प्रतिनिधी
   गोकुळच्या (Gokul) सभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने गोकुळची सभा चाळीस मिनिटात आटोपती घ्यावी लागली. सत्ताधाऱ्यांकडून सभेचे पूर्ण कामकाज करण्याची तयारी असतानाही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे कामकाजामध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे सभेचे कामकाज गोंधळामध्येच संपवावे लागले.

  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सर्वसाधारण सभा आज बूधवारी दुपारी एक वाजता पंचतारांकित एमआयडीसी येथील महालक्ष्मी पशूखाद्य सेंटर येथे झाली. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे आजारी असल्यामुळे सभेला येऊ शकले नाही. त्यांनी घरातूनच मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ संचालक अरुण नरके अध्यक्षस्थानी होते. सभेची सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली.
    विषयपत्रिकेवरील वाचन सुरू असतानाच थांबवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना शांत बसण्याचे आवाहन केले जात होते. पण विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून सभेचे कामकाज पूर्णपणे चालवण्याची तयारी दर्शविण्यात येत होती. तशी तयारी पण होती . पण विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे सभा आटोपती घ्यावी. लागली. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी गोकुळचे उत्पादन गुजरात राज्यामध्ये पोहोचले आहेत असे आवर्जून सांगून गोकुळच्या प्रगतीविषयी माहिती दिली. गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने त्याचे पडसाद आजच्या सभेवर उमटले.
   गोकुळे सभेसाठी जय्यत तयारी केली होती. विद्यमान चेअरमन रविंद्र आपटे हे आजारी असल्याने सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषय वाचन सुरुवात करताच विरोधकांनी मागील प्रोसिडिंग वाचन करावे . असा जोर धरला आणि गोंधळाला सुरुवात झाली .
यावेळी विरोधकांना शांत करण्यासाठी संचालक बाळासाहेब खाडे व रणजीत पाटील यांनी शांतता राखण्याचे आवाहन व विनंती केली पण विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते .
   त्यानंतर अध्यक्ष अरुण नरके यांनी सभासदांना शांत रहा असे म्हणत तुमचे किती प्रश्न असतील ते विचारा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल परंतु दंगा करू नका . यावेळी विरोधी सभासद आणि सत्ताधारी सभासद यांच्याकडून मंजूर नामंजूर अशा घोषणा सुरू होत्या. गोंधळाच्या वातावरणातच सर्व विषय वाचन करण्यात आले आणि सभा अटोपण्यात आली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा झाल्याने सत्तारुढ व विरोधक गटाची जोरदार तयारी दिसून आली. सभेसाठी सभासद सकाळी १२ पूर्वी सभासद उपस्थित झाले होते. यावेळी गोकूळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजीतसिह पाटील, विश्वासराव पाटील, अरुणकुमार डोंगळे, संचालक आमदार राजेश पाटील, दीपक पाटील, विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे, उदय पाटील सत्यजित पाटील, अमरीश घाटगे, रामराजे कुपेकर, धैर्यशील देसाई, बाबा देसाई, तसेच संघाचे कार्यकारी संचालक घाणेकर, संघाचे जनसंपर्क अधिकारी पी आर पाटील, जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

सभेमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षी पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. यावर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही ही सभा होत आहे. सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यंदाही जवळपास 2 डीवायएसपी, 3 पोलीस निरीक्षक आणि सव्वाशेहून अधिक पोलीस सभास्थळी तैनात करण्यात आले आहे.

error: Content is protected !!