६ एप्रिल – दिनविशेष

१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.

१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.

१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.

१९०९: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म.

१९१७: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म. 

१९१९: कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म.

१९२७: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म.

१९५६: क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म.

१९८३: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचे निधन.

error: Content is protected !!