१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
१९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म.
१९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म.
१९३८: संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म
१९५०: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ओडिया चित्रपट अभिनेते विजय मोहंती यांचा जन्म.
१९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.
१८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू.
१८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन.
१९०६: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचे निधन.
१९५३: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे निधन.
संग्रहित माहिती