वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लांबवले

गारगोटी /प्रतिनिधी
   भुदरगड तालुक्यातील वरेकरवाडी -शिंदेवाडी रस्त्यावर वृद्धेच्या गळ्यातील दागिने एक अज्ञात मोटारसायकल स्वाराने हिसडा मारून लांबवल्याची घटना आज दुपारी घडली, या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.
    भुदरगड तालुक्यातील वरेकरवाडी-शिंदेवाडी रस्तालगत फाट्यावर आज गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता श्रीमती इंदूबाई केरबा यादव (वय वर्ष ७०) या वृद्धेच्या गळ्यातील वीस हजार किंमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची मोहनमाळ व दहा हजार किंमतीची तीन ग्रॅम वजनाची अष्टपैलू सोन्याची माळ असा तीस हजार रुपयेचा ऐवज मोटारसायकलवरून आलेल्या २५ ते ३० वर्षे वय असणाऱ्या अज्ञात युवकाने लांबवला. अशी फिर्याद वृद्धेने भुदरगड पोलिसांत दिली आहे, विशेष म्हणजे वरेकरवाडी हे गाव दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे, अशा निर्जन परिसरात सुद्धा अशी चोरी होण्याची घटना होत आहे याबाबत भितीने चर्चा होत असुन परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मयेकर करत आहेत.

error: Content is protected !!