पोलीस कारवाईत १ लाख ७५ हजार किंमतीचे रसायन व तयार दारू नष्ट …..

हातकणंगले / प्रतिनिधी

    मुडशिंगी(ता.हातकणंगले) येथील बेकायदेशीर गावठी दारु तयार करणाऱ्या भट्टीवर हातकणंगले पोलीसांनी छापा टाकुन तब्बल १लाख ७५ हजार किंमतीचे रसायन व तयार दारू जप्त करून नष्ट केली. ही कारवाई प्रक्षि.पोलीस उपअधिक्षक साहिल झरकर यांच्या पथकाने केली .

   याबाबत आधिक माहिती अशी कि , मुडशिंगी येथे बेकायदेशीर हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती हातकणंगले पोलीसांना मिळाली होती . त्या अनुषंगाने छापा टाकुन कारवाई केली. कारवाईत तब्बल १लाख ७५ हाजार किंमतीचे रसायन व तयार दारू जप्त करून नष्ट केली.

       सदर कारवाईत प्रशि. पोलीस उपअधिक्षक साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. अतुल निकम , सागर पोवार , संग्राम पाटील यांनी केली.


error: Content is protected !!