श्री. बाळूमामा मंदिराचा पायाभरणी शुभारंभ संपन्न ;मंदिरासाठी सर्वत्तोपरी सहकार्य करण्याचे जि.प. सदस्य माने यांची ग्वाही …..

पट्टणकोडोली / प्रतिनिधी
      हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील कुंभार गल्लीमधील श्री. संत बाळूमामा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत जागृत श्री. बाळू मामा मंदिराचा पायाभरणी समारंभ हातकणंगले तालुक्याचे भाजपा – जनसुराज्यचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या शुभहस्ते मोठ्या भक्तिभावाने पार पडला.

     यावेळी जि.प. सदस्य माने यांनी बाळूमामा मंदीर पट्टणकोडोली येथे असणे गरजेचे असुन गावच्या भावना बाळुमांमांच्या भक्तीशी जोडल्या गेल्या आहेत. याकरिता मंदिरासाठी सर्वत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
    कार्यक्रमास पट्टणकोडोली मधील सामाजिक कार्यकर्ते भाऊबली उपाध्ये, दीपक उपाध्ये ,पुजारी प्रकाश कुंभार , भक्त बाळासो कुंभार,उदय उपाध्ये ,गुंडा वडर, दत्तात्रय देळेकर, अशोक कुडाळकर, सुधाकर भोसले,विश्वनाथ जाधव, बाळासो मेडशिंगे व श्री संत बाळू मामा भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!