इचलकरंजी / प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहनाची घटना अत्यंत दुर्दैवी आणि सर्वांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. याप्रश्नी आपण निश्चितपणे विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन भोरे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही आम. प्रकाश आवाडे यांनी दिली.

नरेश भोरे यांनी नगरपरिषदेच्या आवारातच आत्मदहन केले. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधितांना अटक करुन कारवाई व्हावी . यासाठी भोरे कुंटुंबियानी न्याय मिळावा , यासाठी भोरे यांच्या नातेवाईकांनी प्रांत कार्यालयात सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
न्याय व हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ता झगडत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यापेक्षाही न्यायासाठी भोरे यांनी टोकाची भूमिका घेतली असताना प्रशासनाने त्याची गांभिर्याने दखल न घेणे अत्यंत दुर्दैवी आहे. भविष्यात अशा घटना घडु नये . असे प्रशासनाला ठणकावून सांगणार असल्याचेही आम. आवाडे यांनी सांगितले .