हातकणंगले / प्रतिनिधी
तालुक्याचे ठिकाण असलेल्या हातकणंगले येथील पोष्ट कार्यालयामध्ये आधारकार्डची सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी माणुसकी फोंडेशनच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात रोज हजारो नागरिक शासकीय कामासाठी हातकणंगले येथे येत असतात. हातकणंगले पोस्ट ऑफिसमध्ये आधारकार्डची सेवा सुरू होती. पण सद्या काही कारणास्तव अनेक महिन्यापासुन सेवा बंद आहे. परिणामी नागरिकांना इचलकरंजी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांना मानसिक, शारीरिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तेथे पहाटेपासुन रांगेत उभे रहावे लागते. रांगेत सात ते आठ तास थांबुन सुद्धा सर्वर डाऊन असल्याच्या कारणास्तव आधार कार्ड मिळत नाही .
तसेच जर पोस्ट ऑफिसकडे मनुष्य बळ अपुरे असेल तर कोणत्याही महा-ई-सेवा केंद्राकडे काम द्यावे . व हातकणंगले मध्ये आधारकार्ड सेवा सुरू करावी . अशी मागणी निवेदनातुन केली आहे .
यावेळी सदस्य सागर नलवडे, सचिन बोराडे, गोमटेश रोकडे, अमोल मोंगले आणि अभिजीत बोराडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
