
नवे पारगाव /प्रतिनिधी
तळसंदे (ता. हातकणंगले जि. कोल्हापुर) येथील एका शेतमालकाचा ऊस ट्रॅक्टर ट्राॅलीतुन भरून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दत्त दालमिया शुगर फॅक्टरीकडे जात असताना मोहिते व महात्मा फुले सुत गिरणी दरम्यानच्या महात काट्यासमोर भरधाव डंपरने चिरडल्याने भीषण अपघातात ट्रक्टर-ट्राॅलीचालक ऊसमजुर जागीच ठार तर एकजण गंभीर झालेची घटना घडली. कैलास दत्तु काळेल (वय ३५) हे मयत व्यक्तीचे नाव असुन धुळा शिवाजी शिंदे (वय ३८ ) हे यातील गंभीर जखमी आहेत.घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत घटनास्थळ व वडगाव पोलीसातुन मिळालेली माहिती अशी की,बुधवारी दुपारी यातील मयत व जखमी हे त्यांच्या स्वतःच्या ट्रॅक्टर (क्र.एमएच-११,बीए-११७२) या दोन ट्राॅलीमधुन तळसंदे येथील एका शेतमालकाचा ऊस भरून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना मोहिते सुत गिरणी जवळील महात काट्यासमोर पुढील ट्राॅलीचे (क्र.एमएच ११-आर-८९६०) चे उजवे चाक पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर थांबवुन चालक कैलास काळेल हे मागील ट्राॅलीचे (क्र.एमएच ४५ ए-६८२०) स्टेफनी काढत होते. तर धुळा शिंदे त्याना काढणेस मदत करीत असताना नेमक्या याच वेळेस वाठारहुन कोल्हापूरच्या दिशेनी जाणा-या भरधाव डंपरचा (क्र.एमएच ०९-एल-४४३३) अंदाज आल्याने डंपरला चुकवण्याच्या प्रयत्नात धुळा शिवाजी शिंदेंच्या (मुळ रा.पाणवण, ता.माण,जि.सातारा) पायाला गंभीर दुखापत होवुन ते डाव्या बाजुला फेकल्याने थोडक्यात बचावले,तर कैलास दत्तु काळेल (मुळ रा.जांभुळणी, ता.माण,जि.सातारा सध्या रा.माळभाग तळसंदे) याना भरधाव डंपरने चिरडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले.यावेळी कैलासच्या डोक्याची कवटी फुटून मेंदु इतस्तः पसरलेने अपघाताचे दृष्य भयावह होते. अपघातस्थळी वडगाव पोलीसानी धाव घेत जखमी धुळा शिंदे याला कोल्हापूर बावडा येथील शासकीय सेवा रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करून सोपस्कार उरकले. नवे पारगावच्या ग्रामीण रूग्णालयात राञी डाॅ.सुदर्शन खराटे, यानी शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.अधिक तपास वडगाव पोलीस ठाण्याचे हे.पो.काॅ.विजय गुरव,पो.काॅ.असिम महात,पो.ना.बाबासो दुकाने करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दुष्काळी भागातुन यातील मयत कैलास काळेल हे आपल्या नातलगांसह मागील आठच दिवसापुर्वी दत्त दालमिया शुगर फॅक्टरीसाठी ऊसतोडी मजुर टोळीसह तळसंदे (ता हातकणंगले) येथील माळभागात राहण्यासाठी आले होते,तर आजच्या भीषण अपघातातील कैलास यांच्या जाण्यानी या टोळीवर ऐन दिवाळी सणात काळाने घाला घातला.कैलासच्या पश्चात पत्नी, आई,वडील, दोन मुली,दोन मुले,भाऊ असा परिवार आहे.राञी उशिरा जांभुळणी ता.माण,जि.सातारा या मुळ गावी अंत्यसंस्कारविधी उरकण्यात आला.