कुंपन व जमिन वादातुन युवकाचा खुन

पारगाव /प्रतिनिधी

      घराजवळील कुंपणाच्या व जमिन वादातुन पस्तीस वर्षीय युवकाचा खुन झाल्याची घटना आज (गुरूवारी ) सकाळी तळसंदे (ता. हातकणंगले ) येथे घडली. अविनाश भगवान कांबळे असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबतचा गुन्हा वडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

      भगवान सहदेव कांबळे व शिवाजी रामू कांबळे या चुलत भावांमध्ये जमिनीचा आणि घराशेजारील कुंपणावरून अनेक वर्षे वाद सुरु होता. सुरवातीला कुंपणाच्या कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये जोरात वाद झाला . त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मारामारी झाली. या मारहाणीत अविनाशचा मृत्यू झाला. अविनाश कांबळे यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास वडगांव पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!