घोडावत पॉलीटेक्निक मार्फत ११ डिसेंबर रोजी ‘ऑप्शन फॉर्म ‘ कसा भरायचा याविषयावर प्राचार्य विराट गिरी यांचे मार्गदर्शन …..

प्राचार्य विराट गिरी

हातकणंगले / प्रतिनिधी
    तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्यावतीने डिप्लोमा प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी व तो निश्चित करण्यासाठी दिनांक १२ ते १४ डिसेंबर हा कालावधी घोषित करण्यात आला आहे. संजय घोडावत पॉलीटेक्निक मार्फत ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, योग्य शाखेची व योग्य कॉलेजची निवड कशी करायची याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य विराट गिरी यांचे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान शुक्रवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यान ऑनलाईन वेबिनारद्वारे होणार आहे.
    विद्यार्थी व पालकांच्या मनातील ऑप्शन फॉर्म भरण्यासंबंधी असणारी संभ्रमावस्था दूर करण्यासाठी संजय घोडावत पॉलीटेक्निक मार्फत दरवर्षी ऑप्शन फॉर्म संबंधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते. संजय घोडावत पॉलीटेक्निकने विनामूल्य ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरून देण्याची सुविधादेखील कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिली आहे. हा ऑनलाईन मोफत वेबिनार असून इच्छुक विद्यार्थी व पालकांनी https://forms.gle/HvpFuxKYRvc9WGc1A या लिंक वर जाऊन आपले नाव, ई-मेल व संपर्क क्रमांक इत्यादी माहिती भरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनाच या करिअर वेबिनारची लिंक पाठवली जाईल. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी ९०२८४५६६५३, ९९६०१७१८४१ या नंबरवर संपर्क साधावा.
    ऑनलाईन वेबिनारसाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

     इच्छुक विद्यार्थी व पालकांनी खालील SGP हे निळे बटन क्लिक करून आपली माहिती भरणे अनिवार्य आहे.

 

error: Content is protected !!