संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये इंनोव्हेशन रिसर्च सेंटर सुरु केंद्रीय शिक्षण मंत्रालय व एआयसीटीई कडून मान्यता

कोल्हापूर प्रतिनिधी:
      अवघ्या ६ वर्षाच्या कालावधीत सर्व शाखांना एनबीए मानांकन मिळविलेल्या संजय घोडावत पॉलीटेक्निक (sanjay ghodawat polytechnic) ला नुकतेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इंनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांच्याकडून इंनोव्हेशन रिसर्च सेंटर सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. एआयसीटीई चे चेअरमन श्री.अनिल सहस्रबुद्धे व इंनोव्हेशन सेल चे सीआयओ डॉ.अभय जेरे यांच्या स्वाक्षरीचे मान्यता प्रमाणपत्र संजय घोडावत पॉलीटेक्निकला देण्यात आले.
याबद्दल बोलताना प्राचार्य श्री.विराट गिरी म्हणाले ” केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून उपलब्ध उपकरणे, साधन सामुग्री व इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी निकष लावूनच ही मान्यता देण्यात येते. या इंनोव्हेशन सेल मार्फत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संशोधन अभिवृत्तीस चालना दिली जाईल व त्यांच्याकडून नवनवीन कल्पना घेऊन विविध प्रकल्पाच्या माध्यमातून संशोधन व तंत्रज्ञानास प्रेरित केले जाईल.एकंदरीतच येणाऱ्या काळात विद्यार्थी व शिक्षकांना या संशोधन केंद्राचा खूप फायदा होणार असून ते त्यांच्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करतील अशी अशा आहे”.
संजय घोडावत पॉलीटेक्निकने दर्जेदार शिक्षण, यशस्वी निकाल व प्लेसमेंट या त्रिसूत्रीतून पालक व विद्यार्थी यांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.
     येथे मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणामुळे या आधी संजय घोडावत पॉलीटेक्निक ला नवभारत टाईम्स कडून ”बेस्ट पॉलीटेक्निक इन महाराष्ट्र ” तसेच टुडे रिसर्च अँड रेटिंग्स, नवी दिल्ली या संस्थेमार्फत ”बेस्ट अपकमिंग पॉलीटेक्निक इन महाराष्ट्र ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित उत्कृष्ट प्रयोगशाळा स्पर्धेत संजय घोडावत पॉलीटेक्नीक च्या इलेक्ट्रिकल मशीन लॅब ला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. मेकॅनिकल इंजिंनिरिंग, सिव्हिल इंजिंनिरिंग, इलेक्ट्रिकल इंजिंनिरिंग,कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिंनिरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिंनिरिंग या शाखांमधून येथे शिक्षण उपलब्ध आहे. शासन नियमानुसार सर्व शिष्यवृत्या उपलब्ध असून तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांकडून उत्तम मार्गदर्शन दिले जाते.याचबरोबर विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये बस व वसतिगृहाची सोय ही उपलब्ध आहे.

      याबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत(sanjay ghodawat, विश्वस्त श्री.विनायक भोसले यांनी प्राचार्य श्री.विराट गिरी व सर्व टीम चे अभिनंदन केले.

error: Content is protected !!