वारणा महाविद्यालयाने साधला ‘संवाद सैनिकांशी’ ; सैनिकांनी भावनिक व समर्पक उत्तरे देत कथन केला थरारक अनुभव…

वारणानगर / प्रतिनिधी
    वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामधील माजी विद्यार्थी आणि सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या शहाजी भोसले, शिवराज पायमल आणि महेश पाटील या फौजींचा सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयांमध्ये आयोजित “संवाद सैनिकांशी”, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आपले जिगरबाज फौजी यांची प्रकट मुलाखत कार्यक्रमात फौजी शहाजी भोसले यांचा सत्कार करताना प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत समन्वयक प्रा. डी. एस. पोवार, फौजी महेश पाटील, शिवराज पायमल.

    महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रमाच्या वतीने आयोजित या समारंभात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देताना फौजीनी आपले थरारक अनुभव कथन करताना सांगितले की,
“फौजी आत्मविश्वासाच्या जोरावर मैदानावर यश मिळवतात. आर्मी शिवाय ही अन्य क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करुन देशसेवा करता येते. महाविद्यालयीन जीवनात
    शरीर कमावण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सीमेवर कार्यरत असताना शत्रुपक्ष कसा वरचढ आहे . याच्यापेक्षा आमचे जवान किती खंबीर आहेत . त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या टेक्नॉलॉजीपेक्षा आमचं लढणं आणि मरणं हे याच शिवरायांच्या मातीतून शिकलो असल्याने जवानांच्या कर्तुत्वावरती विश्वास ठेवा. इतिहास आहे की, भारतीय जवान कुठल्याही संघर्षाला तोंड देण्यात कधीही कमी पडलेला नाही.

प्रकट मुलाखत घेताना महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी.

    जय जवान आणि जय किसान हा नारा आजही अभिमानाने देशवासीय देत आहेत. परंतु आज किसानच अडचणीत आहे . आणि जवानांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर होत चालला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. प्रकट मुलाखत ऋतुजा घनवट, प्रथमेश पोवार, पुनम लोहार, यश पाटील, श्वेता पवार, सादिया कुरणे, स्नेहल घोलप आणि सानिका जाधव यांनी घेतली.
प्रारंभी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी जवानांचे औक्षण करून स्वागत केले. जवानांचा सत्कार प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. पत्रकारिता क्षेत्रातही तीस वर्षाहून अधिक काळ काम करून महाविद्यालयाचाही नावलौकिक वाढवल्याबद्दल डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांचा व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्यावतीने समन्वयक प्रा डी.एस. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभागाच्या प्रीती शिंदे – पाटील, डॉ. संतोष जांभळे, प्रा. वर्षा राजपूत यांनी केले.
    कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने झाला. प्रारंभी समन्वयक प्रा. डी. एस. पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पृथ्वी झोरे आणि तनिषा लोहार यांनी केले. प्रा. एस.आर. घोडके यांनी आभार मानले.

error: Content is protected !!