इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी प्रेस क्लब व इचलकरंजी लायन्स क्लब यांच्या वतीने माणुसकी फाऊंडेशन या संस्थेने उत्कृष्ठ सामाजिक कार्य केल्याबद्दलचा विशेष पुरस्कार बी.न्युजचे संपादक श्री.चारुदत्त जोशी यांच्या हस्ते देणेत आला.

यावेळी माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने माणुसकी फाऊंडेशनचे सर्व सदस्यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी बी न्यूज चे संपादक चारुदत्त जोशी,माजी आमदार सुरेश हाळवणकर इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी,स्वप्नील आवाडे,उपनगराध्यक्ष श्री.तानाजी पोवार,इचलकरंजी लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री.सारडा,इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री.सुनिल मनोळे,उपाध्यक्ष श्री.संजय कुडाळकर,तसेच इचलकरंजीचे सर्व पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.