बीव्हीजीच्या (BVG) 108 ॲम्बुलन्स करिता डॉक्टर भरती – डॉ. अरूण मोराळे

कोल्हापूर / प्रतिनिधी

   महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्हिस म्हणजे 108 ॲम्बुलन्समध्ये वैद्यकीय (Doctor Recruitment) अधिकारी पदे भरणेत येणार आहेत. त्याकरिता बीएएमएस/ बीयुएमएस डॉक्टरांची कोल्हापूर , सांगली , रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण 40 पदे भरावयाची आहेत . त्यासाठी डॉक्टरांनी 14 मार्च पर्यंत ऑनलाइन बायोडाटा पाठविण्याचे आवाहन बीव्हीजी एमईएमएसचे कोल्हापूर झोनल कन्सल्टंट डॉ . अरुण मोराळे यांनी केले आहे .

    वैद्यकीय अधिकारी प्रत्येक जिल्ह्यासाठी दहा पदे असून प्रतिमहिना एकत्रित मानधन (कमांडो ) बारा तासासाठी 26 हजार रूपये व 24 तासांसाठी 52 हजार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नियमाप्रमाणे लागू असणारे अधिक भत्ते देण्यात येणार आहेत . पात्र उमेदवारांना तात्काळ 15 मार्च रोजी ई-मेल द्वारे निवड कळविण्यात येणार असून त्वरित नेमणूक करणार करण्यात येणार असल्याचे डॉ. अरुण मोराळे यांनी सांगितले आहे.
   तसेच बायोडाटा सोबत दहावी , बारावी मार्कलिस्ट ,डिग्रीचे पासिंग सर्टिफिकेट तसेच एम सी आय एम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा एर्टनशिप पूर्ण केलेले सर्टिफिकेट , आधार कार्ड व पॅन कार्ड कॉपी ही कागदपत्रे पाठवावीत.

error: Content is protected !!