चार टक्का मोळी बांधणी वजावटसाठी अंकुश व जय शिवराय आक्रमक ; उद्या सकाळी दहा वाजता शरदवर ढोल बजाव आंदोलन…..

पेठ वडगांव / प्रतिनिधी

   सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास गेल्यानंतर मोळी बांधणी म्हणून जे वाडे मोळी साठी वापरले जात होते . त्याच्यामुळे वजन वाढते, असे सांगून पूर्वीपासूनच यासाठी एक टक्का मोळी बांधणी वजावट सर्वच कारखानदार करत आहेत. परंतु अलीकडे सर्वच कारखान्यांनी ऊस तोडी साठी मशीन्स घेतल्या आहेत. या मशिनने जो ऊस तोडला जातो . त्यातून पाला जास्त प्रमाणात येतो , असे कारण सांगून आपल्याकडून पाच टक्के मोळी बांधणी वजावट करत आहेत. यासाठी जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुशने गेले वर्षभर सातत्याने आवाज उठवून साखर आयुक्त पुणे यांना मशीन तोडीतून एक टक्क्यापेक्षा जास्त पाला जात नाही . हे पटवून दिले व त्यांनीही याबाबत महाराष्ट्रातील सर्वच कारखानदारांना मशिनने ऊस तोडी केल्यानंतर एक टक्क्यापेक्षा जास्त मोळी बांधणी घेता येणार नाही . असे लेखी आदेश काढलेले आहेत. असे असताना आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त साखर कारखाना शिरोळ, छत्रपती शाहू साखर कारखाना कागल व मंडलिक कारखाना हमिदवाडा या कारखान्यांनी मशीनतोड केलेल्या ऊसातून एक टक्काच पाला कपात करत आहेत. परंतु इतर साखर कारखानदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. याविरोधात जय शिवराय किसान संघटना.
    आंदोलन अंकुश या दोन्ही संघटनांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना निवेदन देऊन एक टक्काच मोळी बांधणी घ्या , असे सांगितले होते. तरीही साखर आयुक्तांचा आदेश असूनही इतर कारखानदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. यामुळे ज्यादा 4 टक्के पाला कटिंग धरल्यामुळे शेतकऱ्यांचे टनाला 120 रुपये नुकसान होत आहे व हे आज पर्यंत शेतकऱ्यांच्या वा कोणाच्याही लक्षात आले नाही. यासाठी आंदोलन अंकुश चे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे व शिवाजी माने, अध्यक्ष, जय शिवराय किसान संघटनचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी साखर आयुक्तांना पटवून देऊन एक टक्क्याचा आदेश काढायला लावला होता. तरीही या आदेश मानत नसलेल्या शरद साखर कारखान्याच्या समोर प्रशासनाला जाग यावी . यासाठी ढोल बजाव आंदोलन गुरुवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आंदोलनाचे आयोजन केले आहे . तरी सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी या आंदोलनाला उपस्थित राहावे . असे आवाहन अंकुश व जय शिवराय संघटनेच्या वतीने धनाजी चुडमुंगे व शिवाजी माने यांनी केले आहे .
   भविष्यकाळात इतर कारखान्यांवरतीही टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे. परंतु राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मंत्री असल्यामुळे त्यांनी मंत्री पदाची शपथ घेताना, घटनेला स्मरून मी सर्वसामान्य जनतेला त्रास होईल असे वर्तन करणार नाही. अशी शपथ घेतलेली आहे. तशी शपथ सर्वच मंत्री घेत असतात. परंतु जिल्ह्यातील जर तीन -चार कारखाने एक टक्का घेत असतील, तर इतर कारखान्यांना याबाबत अडचण असण्याचे कारण नाही. परंतु हे सर्वजण झोपेचे सोंग घेऊन शेतकर्‍यांना लुबाडत आहेत. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या विरोधात जोरात आवाज उठवणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच प्रथम आम्ही मंत्र्यांच्या कारखान्या समोरूनच आंदोलनाला सुरुवात करीत आहोत . तरी शेतकरी बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन शिवाजी माने अध्यक्ष, जय शिवराय किसान संघटना व धनाजी चुडमुंगे, अध्यक्ष, आंदोलन अंकुश यांनी केले आहे .

error: Content is protected !!