ब्रिलियंट स्कूल येथे रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

कुंभोज वार्ताहर/आकाश शिंदे

  जयहनुमान शिक्षण प्रसारक मंडळ अमृतनगर संचलीत ब्रिलियंट स्कुलस् नरंदे (narande) ,(ता.हातकणंगले) व आनंद शैक्षणिक सामाजिक सेवाभावी संस्था, काळजवडे,(ता. पन्हाळा) (panhala) यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मोटर वाहन निरिक्षक बालाजी धनवे, उपस्थीत होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोल्हापूर मोटर वाहन निरिक्षक बालाजी धनवे..

  यावेळी बालाजी धनवे यांनी रस्ता सुरक्षा- जिवन रक्षा याबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थीतीत शहाजी लॉ कॉलेजचे प्राध्यापक पी.एस. किल्लेदार, जयहनुमान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितिन पाटील, मुख्याध्यापिक शुभांगी पाटील, अधिक्षक प्रविण पाटील, तसेच रेश्मा शेटे, शितल शेटे, जयश्री पल्लखे, श्रध्दा गुरव, प्रज्ञा कोठावळे इत्यादी शिक्षक उपस्थित होते.सुत्रसंचालन सहा. शिक्षक विक्रम माने यांनी केले तर आभार शैलजा पल्लखे यांनी मानले.
.

 

error: Content is protected !!