बुवाचे वठारच्या सरपंचपदी रीना शिंदे, उपसरपंच पदी शंकरराव शिंदे

बुवाचे वठार ता. 11

   बुवाचे वठार (Buwache wathar) ता.हातकणंगले (hatkanangle) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रीना प्रवीण शिंदे यांची तर उपसरपंच पदी शंकरराव मारुती शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे शाखा अभियंता व्ही.व्ही.दुधाळ होते.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.एम.चौगुले यांनी काम पाहिले.
   बुवाचे वठार ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊन यामध्ये उद्धवराज महाराज ग्राम विकास आघाडीची सत्ता स्थापन झाली.शंकरराव शिंदे यांच्या पॅनेलने दहा विरुद्ध एक असा विजय मिळविला. त्यामुळे सरपंच व उपसरपंच निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे दोन्ही निवड प्रक्रिया बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, कृष्णा वठारकर, जावेद पाथरवट, ताई लक्ष्मण अनुसे, संगीता गुंडाप्पा शिंदे, शोभा निवृत्ती शिंदे, मंगल बबन परीट, कोमल स्वप्नील शिंगे व विरोधी गटाचे विजय कागवाडे सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी दिलावर सुतार,सुनील चौगुले,मोहन शिंदे, मदन अनुसे,सागर चव्हाण, शितल हेरले, आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!