कुंभोज वार्ताहर आकाश शिंदे :
कुंभोज ( ता. हातकणंगले ) येथे हजारो वर्षांची परंपरा असणार्या जैन धर्मीयांच्या उगार पद्मावती देवीची मानाच्या सोन्याच्या मूर्तीचे मंगळवारी सकाळी १० वाजता कुंभोज येथे ओटी भरण्यासाठी उत्साहात आगमन झाले. भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे कुंभोज गावचे मानाच्या पाटील घराण्याचा वतीने सदर देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रम पार पडला.

त्यामुळे पद्मावती देवीची ओटी भरण्यासाठी उगार येथील देवीचे कुंभोज येथे आगमन झाल्याने जैन बांधवांच्या श्रावक व श्राविकांत्यात उत्साहाचे वातावरण पसरले होते. सकाळी १० वाजता एसटी बस स्थानक परिसरात जैन बांधवांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे एसटी बस स्थानक परिसर ते जैन मंदिर पर्यंत आकर्षक रांगोळी काढली होती. तसेच विविध सेवा संस्थेच्या वतीने स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या.
सत्य अहिंसा परमोधर्म की जय च्या जयघोषात आज संपुर्ण वातावरण भक्तिमय बनले होते. इतिहासात पहिल्यांदाच उगार स्थित पद्मावती देवीचे भव्य सोन्याच्या मूर्तीचे रथातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कुंभोज येथे आगमन झाले. उगार गावचे शीतल पाटील व कुंभोज गावचे आदित्य पाटील यांनी रथातून पद्मावती देवीच्या मूर्तीचे स्वागत केले.हजारो महिलांची उपस्थिती देवीच्या रथावर होणारी पुष्पवृष्टी व नागरिकांनी देवीला पाहण्यासाठी केलेली गर्दी यामुळे कुंभोज भक्तिमय झाले होते.
