हातकणंगले / प्रतिनिधी :
हातकणंगले तालुक्यातील साठ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने दिनांक १५ डिसेबर रोजी येथील नविन प्रशासकीय इमारतीत काढण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार प्रदिप उबाळे यांनी दिली .
यामध्ये हातकणंगले तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग , सर्वसाधारण , व सर्वसाधारण स्त्री इत्यादी प्रवर्गाचा समावेश असणार आहे .
प्रवर्गनिहाय संख्या पुढील प्रमाने अनुसुचित जाती सर्वसाधारण- ६ , स्त्री – ६ , अनु.जमाती स्त्री -१ , नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण -८, स्त्री -८ , सर्वसाधारण प्रवर्ग -स. सा-१६ , स्त्री -१५ असुन साठ गावातील गुडघ्याला बांशिग बांधलेल्या इच्छुकांना आरक्षण सोडतीची उत्कंठा लागली आहे.