संघाच्या सर्व विभागाने निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करावे -डी. व्ही. घाणेकर

हातकणंगले / प्रतिनिधी
     दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. तो अधिक मजबूत करण्यासाठी संघाच्या सर्व विभागाने निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करावे. असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी केले. ते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे आयोजित विक्री व्यवस्थापन कार्यशाळा समारोप प्रसंगी बोलत होते. पुणे येथील मार्गदर्शक अतुल पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने आयोजित कार्यशाळा समारोप प्रसंगी उपस्थित कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर अतुल पेठे, व्ही.डी.पाटील, डॉ.मोगले, दळवी आदी मान्यवर ..

       घाणेकर पुढे म्हणाले, गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतक-यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला देणारा महाराष्ट्रातील ऐकमेव संघ आहे. त्यांच्या जिवावरच हा संघ मोठा होत आहे. भविष्यात दूध उत्पादक शेतक-यांचे उत्पन्न आहे . त्या पेक्षा दुप्पट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व दूध उत्पादक केंद्रस्थानी ठेवून गोकुळ संघ ना नफा-ना तोटा या तत्त्वावर महालक्ष्मी पशुखाद्य व फर्टिमिन चिलेटेड पावडर बनवत आहे. यामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती वाढते, फॅट, एस.एन.एफ , दूधात वाढ होते. तसेच दोन व्येतातील अंतर कमी होण्यास मदत होते. याची माहिती संस्था       व दूध उत्पादकांपर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याचे घाणेकर यांनी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक अतुल पेठे यांनी संघ, संस्था व दूध उत्पादक यांच्यात सकारात्मक समन्वय कसा साधावा. संघाच्या सर्व विभागाकडून संघ सेवा सुविधा व विक्री वाढ कशी करता येईल. याबाबत विविध पैलू उलगडून सांगितले. तसेच आपल्या मनात दडलेल्या सकारात्मक व नकारात्मक गोष्टींचा उलगडा अतुल पेठे व सहकारी राजू यांनी केला.
स्वागत पशुखाद्य कारखाना व्यवस्थापक व्ही .डी.पाटील यांनी केले, आभार व्ही. टी. पाटील यांनी मानले. नियोजन संगणक प्रमुख आर.बी.पाटील, बी.पी.पाटील, राहूल जाधव, संग्राम पाटील यांनी केले.
    याप्रसंगी पशुसंवर्धन व्यवस्थापक यु.व्ही.मोगले, वैरण विकास अधिकारी भरत मोळे. डॉ. दळवी, डॉ.कामत, डॉ. बारवे . वरिष्ठ संकलन अधिकारी पंडित तेलवेकर, प्रा. एम.पी.पाटील, महिला नेतृत्व प्रमुख सौ. निता कामत, आर.आर.पाटील, सुरेश पाटील, राजू परुळेकर, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!