गरीब महिलांचे अश्रु पुसण्यास फिनकेअर सदैव तत्पर – कल्याणशेट्टी ; फिनकेअरकडुन महिलांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप….

नवे पारगाव /प्रतिनिधी
    नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील श्रमिक कष्टकरी बचत गटातील महिलांना कोरोना-कोविड पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील फिनकेअर स्माॅल फायनान्स बँकेकडुन सामाजिक जाणीवेतुन घरगुती जीवनावश्यक वस्तुंचे फिनकेअर ग्रुपमधील मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

नवे पारगाव- येथील फिनकेअर स्माॅल फायनान्स बँक व फिनकेअर बिझनेस सर्हिस प्रा. लि.कोल्हापुर यांच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर महिलांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करताना महेश कल्याणशेट्टी, अविनाश कांबळे, वाशिम मुल्ला, शुभांगी लोखंडे, अनिता सोने,सुनिता जोशी,ज्योती खिल्लारे,मंगल गायकवाड, वर्षाराणी पाटील आदि मान्यवर …

     गावातील फिनकेअर बचत गटातील सुमारे ३० महिलांना कोल्हापूर फिनकेअर स्माॅल फायनान्स बँक व फिनकेअर बिझनेस सर्हिस प्रा.लि.यांचेवतीने महिलांना सामाजिक जाणीवेतुन मदतीच्या स्वरूपात हे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
      यावेळी फिनकेअर ग्रुपचे डिव्हीजन मॅनेजर महेश  कल्याणशेट्टी बोलताना म्हणाले,’फिनकेअरने सामाजिक बांधिलकीतुन यापुर्वी सुद्धा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुर काळात महापुरातील पुरग्रस्त गावातील महिला व नागरिकांना फिनकेअर कडुन गरजुना  यथोचित जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला होता. सध्या कोरोना महामारीमुळे गेले ९-१० महीन्याच्या कालवधीत ग्रामीण भागातील  विशेषतः कष्टकरी गरीब व रोजंदारीवर काम करणा-या महीलाना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे,यावर महिलांना फिनकेअर ग्रुपकडुन हा छोटासा मदतीचा हात आहे.भविष्यातही अडचणींचा सामना कराव्या लागणारे अशा गरीब महिलांचे अश्रु पुसण्यास फिनकेअर सदैव तत्पर असेल,असेही कल्याणशेट्टी यांनी सांगितले.     
       यावेळी रिजनल मॅनेजर अविनाश कांबळे,सेंट्रल मॅनेजर वशिम मुल्ला आदीनी मनोगते व्यक्त केली. यावेळी ब्रॅच मॅनेजर सतिष किणींगे, जाफर शेख, पञकार शिवकुमार सोने, मंगल पाटील, सुनीता लोखंडे, शुभांगी लोखंडे, शोभा सोने, ज्योती खिल्लारे, वर्षाराणी पाटील, सुनीता जोशी, मंगल गायकवाड आदींसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

error: Content is protected !!