खोची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जगदीश पाटील, उपसरपंचपदी रोहिणी पाटील

खोची वार्ताहर

      खोची(khochi) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जगदीश पाटील यांची तर उपसरपंचपदी रोहिणी दादासो पाटील यांची निवड करण्यात आली दोन्ही निवडी हात उंचावून मतदान घेऊन करण्यात आल्या. विशे,ष सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी व शिक्षण विस्ताराधिकारी होते तर तलाठी वर्षा अवघडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

    ग्रामपंचायत पदाधिकारी निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती निवड प्रक्रियेदरम्यान दोन्ही पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आले यावेळी सरपंच पदासाठी पाटील चव्हाण गटाकडून जगदीश पाटील तर विरोधी गटाकडून प्रमोद सूर्यवंशी यांचा अर्ज करण्यात आला यावेळी हात उंचावून मतदान घेऊन सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली तर ‌उपसरपंच पदासाठी रोहिणी दादासो पाटील यांचा पाटील व चव्हाण गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला विरोधी गटाकडून वैशाली वाघ यामध्ये हात उंचावून मतदान होऊन रोहिणी पाटील यांना उपसरपंचपदी निवडण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वाती सिद्ध प्रमोद सूर्यवंशी अभिजीत चव्हाण प्रमोद गुरव वैशाली वाघ, राजकुमार पाटील, पूनम गुरव, स्नेहा पाटील, सुहास गुरव, कमल ढाले आदी उपस्थित होते. पदाधिकार्‍यांच्या निवडी नंतर निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा अवघडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी वारणा दूध संघाचे संचालक दीपक पाटील प्राध्यापक बी.के चव्हाण वसंतराव गुरव, कुमार पाटील, विजय पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते

error: Content is protected !!