आयुष्यातल्या………… प्रत्येक वळणावर “संघर्ष ” करत, जगण्याची परिभाषा बदलणाऱ्या आणि संघर्ष हाच माझा “अलंकार ” असून तो परिधान करायला भीती कुणाची हा दृढनिश्चय अंगी बाळगणार्या,आणि दुर्दैवाने आपल्या दोन्ही ” किडनी ” निकामी झालेल्या, नितीन दिलीप पाटील (रा.भादोले ता. हातकणंगले ) या युवकाची माहिती दलित मित्र आणि जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने (बापू )यांना समजली. तात्काळ त्यांनी त्या मुलाच्या घरी धाव घेऊन विचारपूस तर केलीच पण क्षणाचाही विलंब न लावता आर्थिक मदत केली. एवढ्यावरच न थांबता त्याच्या पुढील उपचारासाठी मुंबई आणि परिसरातल्या उद्योजक, व मित्र परिवाराच्या वतीने मदत करण्याची ग्वाही दिली.

राजकारणाच्या चाकोरीबद्ध वाटेने जाणाऱ्या व भल्या मोठ्या बाता मारणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत अशोकराव माने यांनी केलेली मदत ही जरी तात्पुरती असली तरी देखील आदर्श विचारांचे बाळकडू पाजलेल्या आणि गरजवंताला न्याय देणाऱ्या समग्र भूमिकेची आहे. मी ज्या मातीत जन्मलो, त्या मातीशी इमान राखत मी त्यांचे देणे लागतोय. हा निर्धार मनाशी करत बापूंनी समाजकार्य सुरू केलं आहे.
नितीनला सध्या तरी एका किडनीची गरज आहे.आणि ही गरज ओळखूनच रक्ताच्या नात्याला सोनेरी कळस चढवत, त्याचे वडील दिलीप पाटील हे किडनी प्रत्यारोपणासाठी स्वतःची एक किडनी त्याला देणार आहेत. नाती ही नावापुरती नसतात तर ती वास्तव रुपी बनवायची असतात हा आदर्शाचा दीपस्तंभ नितीनच्या वडिलांनी उभा केला आहे. आणि अशी प्रत्येक नाती घराघरात निर्माण झाली पाहिजेत. आणि यासाठी समाज प्रबोधन हेच माध्यम असल्याचे बापू आवर्जून सांगतात.
हातकणंगले तालुक्याच्या विकसनशील कार्यासाठी बापूंनी वज्रमूठ तर बांधली आहेच. मात्र हातकणंगले तालुक्या तील सामान्यातील – सामान्य घटकापर्यंत न्याय देण्याचा आणि त्याला मदत करण्याची हमी देत अशोकराव माने व त्यांच्या कुटुंबीयांनी सुरू केलेली ही सेवा नक्कीच कौतुकास पात्र आहेत.