सह दुय्यम निबंधक कळसकर यांना मारहाण ; कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयातील कामकाज बंद

कोल्हापूर / प्रतिनिधी
      बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचे सह दुय्यम निबंधक कळसकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मदनराजे गायकवाड यांनी मारहाण केली. संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कळसकर यांना प्रथम जाब विचारत राज ठाकरे यांनी शेतकरी हिताचे आदेश दिल्याचे सांगत मारहाण करून कागदपत्राची फेकाफेकी केली .

     या निंदणीय घटनेचा कोल्हापूर नोंदणी व मुद्रांक विभाग राजपत्रित कर्मचारी संघटनेच्यावतीने निषेध नोंदविला आहे . घटनेच्या निषेधार्थ दिवसभरासाठी कार्यालयीन कामकाज बंद ठेवत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भानसे यांनी सांगितले . तसेच मारहाण केलेल्या गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याबद्दल कठोर शिक्षा करणेची मागणी केली आहे.

error: Content is protected !!