इचलकरंजी / प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेयुवासेना सचिव वरुण सरदेसाईयांच्या आदेशावरून कोल्हापूर ज़िल्हा युवासेना विस्तारकडॉ.सतीश नरसिंग हे कोरोना लॉकडाउन नंतर प्रथमच युवासेना बांधणी, पुणे पदवीधर निवडणूक प्रचार नियोजन, रोजगार मेळावा, युवासेना पदधिकारी बैठक आदी विविध कार्यक्रमासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आले. त्यांनी इचलकरंजी जवाहरनगर येथे युवासेना पदाधिकारी नियुक्ती पत्रप्रदान कार्यक्रम पार पाडला.

यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी युवासेनेमध्ये प्रवेश केला तसेच नव पदाधिकारी नियुक्ती देखील जाहीर झाली.यावेळी डॉ. सतीश नरसिंग म्हणाले , कोरोना पादुर्भाव काळामध्ये युवासेनाने चांगले काम केले आहे. त्याबद्दल युवा सैनिकांचे अभिनंदन , तसेच येणाऱ्या काळामध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिकांनी सक्रिय व्हावे. आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. प्रत्येक गांवा गावांमध्ये युवासेनेची बांधणी करावी असे प्रतिपादन त्यांनी केली.
कार्यक्रमास जिल्हा युवा अधिकारी शिवाजी पाटील, जिल्हा चिटणीस डॉ.सत्यजित तोरसकर, उपज़िल्हा युवा अधिकारी राहुल पाटील, तालुका युवा अधिकारी अविनाश वासुदेव, स्वप्नील भंडारी, प्रतीक धनवडे, नितीन माने, शहरप्रमुख संभाजी चव्हाण, नगरसेवक रवींद्र माने, आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमचे सूत्रसंचलन सागर जाधव यांनी केली तर आभार रतन वाझे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.