साडेतीन किलोची गाठ काढण्यात यश ; भैरवनाथ समूहाच्या केअर हॉस्पिटलची कामगिरी , संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत

हातकणंगले / प्रतिनिधी
   दोन महिलांच्या पोटातील गर्भाशयाच्या पिशवीला असणाऱ्या गाठी काढण्याची किचकट शस्त्रक्रिया कोरोची (ता.हातकणंगले ) येथील डॉ . पी . एस . पाटील यांच्या भैरवनाथ समूहाच्या केअर हॉस्पिटलमध्ये यशस्वी पार पडली . नव्याने सुरू झालेल्या आरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे . शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याने व कोणताही आर्थिक बोजा सोसावा न लागल्याने नातेवाईकांतून समाधान व्यक्त होत आहे .

    या दोन महिलांच्या पोटात अनेक दिवसापासून दुखत होते . तसेच खाल्लेले अन्न पचत नसत व रक्तस्राव होत होता . म्हणून त्यांना केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले . तपासणीमध्ये मोठ्या दोन गाठी गर्भाशयास असल्याचे रिपोर्टमध्ये निदर्शनास आले . तात्काळ शस्त्रक्रिया करून साडेतीन किलोच्या गाठी काढल्या .
     शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ञ डॉ . विकास देवकारे , डॉ .योगेश माळगे भूलतज्ञ डॉ . प्रमोद खाडे , हॉस्पिटलच्या अध्यक्षा डॉ . सौ शुभांगी पाटील , मेडिकल ऑफिसर डॉ .ए.बी. पाटील , संदीप पाटील ,इजाज मुल्ला यांच्या पथकाने केली .
यावेळी विश्वस्त डॉ. प्रदीप पाटील यांनी कोणताही त्रास होत असेल अशा रुग्णांनी केअर सेंटरमध्ये दाखल होऊन मोफत उपचार घ्यावेत . असे आवाहन केले आहे .

error: Content is protected !!