नवीनपिढ्यांच्या भविष्याला आकार देणारी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले नाव भारताच्याकानाकोपऱ्यात पोहोचविलेल्या सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक संस्था म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण कार्याचा आरंभबिंदू आहे. तांत्रिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे हे स्थापनेपासून व्यासपीठ उभे राहिलेले आहे. असे गौरव उदगार “दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल संस्थेचे संस्थापक” मा. श्री. यजूर्वेंद्र महाजन यांनी काढले.

इन्स्टिट्युटच्या प्रांगणात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. विवेक कायंदे, प्राचार्य, डॉ. विराट गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी संजय घोडावत पॉलीटेक्निक ते इन्स्टिट्यूट या संस्थेचा ११ वर्षाचा प्रवास वर्णन व्यक्त्त केले. संस्थेचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या सर्वांचे मनपासून आभारव्यक्त करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील सक्सेस, पालकांचे सहकार्य, संस्थेच्या गुणवत्तेची दखल घेऊन संस्थेला मिळालेले विविध पुरस्कार, उच्च शिक्षणातील गुणवत्ता आणि दर्जावाढीसाठी ‘नॅक’ मूल्यांकन प्राप्त सर्व विभाग, उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या संकुलनात उपलब्ध असलेले अभ्यासक्रम त्यामध्ये एक वर्ष कालावधीचे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम, दोन वर्षे कालावधीचे औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय), तीन वर्षे कालावधीचे तंत्रनिकेतन (डिप्लोमा), आणि चार वर्ष कालावधीचे बी-टेक पदवी अभ्यासक्रमा विषयी माहिती देवून सर्वाना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शन करताना श्री. यजुर्वेद महाजन म्हणाले परमेश्वराने आपल्याला सर्व काही व्यवस्थित दिलेले असून आपण वेळीच अभ्यासाकडे लक्ष नाही दिले तर आपले करिअर सक्सेस होण्यास अडचणी निर्माण होतात. वेळेचा सदुपयोग करून व परमेश्वराचे आभार मानून मला परमेश्वराने सर्व अवयव सुस्थितीत दिलेले असून मी त्याचा सदुपयोग करणे हे निश्चित केले पाहिजे.
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेमध्ये जे दिव्यांग विद्यार्थी मनाशी एकनिष्ठ होऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि त्यामध्ये यशस्वी होऊन आज अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी परिस्थितीची आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संधीचा विचार करून महान माणूस निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजे. त्यांनी त्यांची ओळख मी दीपस्तंभ फाउंडेशनचा संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आहे. सामाजिक चांगुलपणा हा नेहमीच माझा एकभाग राहिला आहे. आणि जेव्हा मी शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये मोठी तफावत पाहिली तेव्हामला फक्त हेच कळले की मला ते बदलायचे आहे.
संजय घोडावत विद्यापीठ कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करूनवर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्याहस्ते प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शंभर टक्के निकाललावणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्प्युटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रा. योगेश पोवार यांनी मानले.
इन्स्टिट्यूटच्या ११व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले यांनी दिल्या आहेत.
