पहिल्यांदा नवरा-बायको सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार

अहमदनगर/प्रतिनिधी

  पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य झाले आणि आता थेट सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार हाकणार आहेत.

  यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram panchayat Election) अनेक कहाण्या बघायला, ऐकायला मिळाल्या. बायकोने नवऱ्याला उचलून घेतल्याचं महाराष्ट्राने पाहिलं, तर आपल्या लाडक्या ‘सौं’ च्या यशाने हुरळून जाऊन नवरोबाने थाटात उचलून घेत बायकोची गावातून मिरवणूक काढली. आता नगरची अशीच एक आगळीवेगळी कथा आहे. पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य झाले आणि आता थेट सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार हाकणार आहेत. (Nagar Husband wife first selected As A Sarpach And Deputy Sarpanch )

  जयश्री सचिन पठारे (Jayashreee Sachin Pathare) या सरपंच तर त्यांचे पती सचिन पठारे (Sachin Pathare) हे उपसरपंच झाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात या दोघा नवरा बायकोच्या राजकीय यशाची चर्चा रंगली आहे. वाळवणे ग्रामपंचायत सदस्यावर आता नवरा-बायको अधिकार गाजवणार आहेत.

  वाळवणे गावची 2 हजार लोकसंख्या असून 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकी 4 बिनविरोध सदस्य झाले असून त्यात हे दोघेही नवरा-बायको बिनविरोध निवडून आले.

  निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने हा मान जयश्री पठारे यांना मिळाला असून गावाने त्यांचे पती सचिन पठारे यांना उपसरपंच करायचं ठरवलं आहे. त्यामुळे दोघेही आता सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले आहे.

error: Content is protected !!