पारगांव/ प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये स्वच्छता आणि एड्स जनजागृती पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय छात्र सेना, ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

छात्रसैनिकांनी परिसराची स्वच्छता, ‘हात धुवा कोरोना टाळा’ अभियान, सार्वजनिक पाणवठा स्वच्छता अभियान, प्लास्टिक कचरामुक्ती अभियान इत्यादी उपक्रमांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. स्वच्छ भारत आणि एड्स जनजागृती या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धेमध्ये साठपेक्षा अधिक छात्रसैनिकांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते झाले. प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय छात्र सेना सहाय्यक अधिकारी कॅप्टन डॉ. सुधाकर खोत आणि लेफ्टनंट सौ. जयंती गायकवाड यांनी केले. एड्स जनजागृती उपक्रमांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, पारगाव येथील श्री. संजय गायकवाड यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांच्या संयोजनासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, तसेच ५६ महाराष्ट्र बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल उदय बारावकर आणि ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन कमांडिंग ऑफिसर मोहन तिवारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.