व्हिजन अॅग्रो कंपनीचा संचालक डॉ. तुकाराम पाटील यास आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

कोल्हापुर / प्रतिनिधी

     ठेवीदारांचे करोडो रुपये बुडवनाऱ्या ‘ व्हिजन एग्रो कंपनी ‘ विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील आरोपी तुकाराम शंकर पाटील (वय वर्षे -40 , रा . माजगाव जि. कोल्हापूर ) हा कोतोली फाटा (ता . पन्हाळा ) येथे येणार असल्याची बातमी पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर यांना बातमीदाराकडून मिळाल्याने त्यास सापळा रचून अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हा शाखेकडील पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर , एएसआय दिलीप कारंडे , पोलीस हवालदार दिनेश उंडाळे , गावडे यांनी केली. यापूर्वी या गुन्ह्यातील आरोपी सुशील पाटील यास पोलीसांनी यवलूज येथून त्याचे राहत्या घराचे पोट माळ्यावरुन पोलीसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.

     मुख्य आरोपी विकास खुडे हा अटक असून सध्या कळंबा जेल कोल्हापूर येथे आहे.पोलीसांनी आरोपींकडून 23 तोळे सोने, २ चारचाकी आलिशान कार, मोटार सायकली , लॅपटॉप कॉम्प्युटर वगैरे रु . तीस लाखाचे वर किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे, आरोपींची फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली स्थावर व जंगम मालमत्ता यांचा शोध सुरू असून ती जप्त करण्याची प्रक्रीया सुरु आहे .
    यातील आरोपी प्रसाद आनंदराव पाटील राहणार निवृत्ती चौक शिवाजी पेठ कोल्हापूर हा अद्याप फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. तुकाराम शंकर पाटील यास उद्या जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट कोल्हापूर यांचे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!