उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु नका.

ब्रम्हांड मधील सर्व शक्ती आपल्या आहेत. पण आपल्या डोळ्यासमोर हात ठेवतो. आणि किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.
कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नाहीतर हात जोडा. आपल्या भावांना आशिर्वाद द्या. आणि त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.
पैसाचा उपयोग कुणाला मदत करण्यासाठी वापरला तर त्याला काही अर्थ आहे. नाहीतर पैसा हा एक वाईट गोष्टीचा ढीग आहे. त्यातुन जेवढ्या लवकर सुटका होईल तेवढ चांगले.
जो व्यक्ती संसारातील गोष्टीमुळे व्याकुळ होत नाही. त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केल आहे.
विश्व हे एक व्यायामशाळा आहे. आणि आपण इथे स्वतः ला मजबुत बनवण्यासाठी आलो आहे
बाह्य स्वभाव हे केवळ अंतर्गत स्वभावाच एक मोठ रुप आहे.
एक कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपल जीवन बनवा. त्याविषयी विचार करा, त्याचे स्वप्न बघा. मेंदु,मांसपेशी, नसा. शरीराच्या प्रत्येक भागात ती कलपना सामावुन घ्या. बाकीच्या विचारांना बाजुला ठेवा. हीच
यशस्वी होण्याची पध्दत आहे.
जेव्हा एखादी कल्पना स्पष्टपणे मेंदवर अधिकार गाजवते. तेव्हा ती मानसिक आणि भौतिक अवस्था
मध्ये परावर्तित होते.
देवाला आपण कुठे शोधणार? जर आपल्याला देव स्वतः च्या ह्रदयात आणि जिवंत प्राण्यात दिसत
नसेल.
तुम्हाला आतुन आणि बाहेरून दोन्ही बाजुने स्वतःचा विकास करावा लागेल.तुम्हाला कोणी शिक्षणदेऊ शकत नाही.कोणी तुम्हाला अध्यात्मिक बनवु शकत नाही. तुमच्या आत्म्याशिवाय कोणीही तुमचा गुरु नाही.
ह्रदय आणि मेंदू या दोघात टक्कर चालु असेल. तर नेहमी ह्रदयाचे ऐकावे.
कुठल्याही गोष्टीची भिती मनात बाळगु नका. तुम्ही अद्भुत काम कराल, हा निर्भीड पणाच
तुम्हाला क्षणभरात परम आनंद देईल.
प्रेम विस्तार आहे, स्वार्थ आकुंचन आहे. त्यामुळे प्रेम हा जीवनाचा सिद्धांत आहे.जे प्रेम करतात ते जिंकतात व जे स्वार्थ करतात ते मरतात. म्हणुन प्रेमासाठी प्रेम करा, हाच जीवनाचा सिद्धांत आहे.
माणसाची सेवा करा. देवाची सेवा करा.
संग्रहित माहिती