गोकुळ संघ व हनुमान दूध संस्थेमुळे उत्पादकांची दिवाळी गोड होण्यास मदत -सुरेश पाटील

हेरले / प्रतिनिधी
   जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ व प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड होण्यास मोठा हातभार लागला आहे. असे मत संघाचे वरिष्ठ पर्यवेक्षक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.

मौजे वडगाव : येथील जय हनुमान सहकारी दूध संस्थेच्या सभासदांना दीपावली बोनसचे वाटप करताना गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ पर्यवेक्षक सुरेश पाटील. प्रसंगी संस्थेचे चेअरमन सतीशकुमार चौगुले ,बाळासाहेब थोरवत , नेताजी माने, आनंदराव पोवार, सुरेश कांबरे, श्रीकृष्ण थोरवत , अण्णासो पाटील आदी उपस्थित मान्यवर.

     ते मौजे वडगाव येथील जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या दीपावली बोनस व भेटवस्तू वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सतीश कुमार चौगुले होते. सुरेश पाटील पुढे म्हणाले, गेली आठ महीने कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे . पण कोल्हापूर जिल्हा दूध संघाने दूध संस्थेना पाठबळ देऊन दुग्धव्यवसाय कठीण प्रसंगीही अखंडितपणे ठेवून ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा दिलासा दिला आहे . सर्व व्यवहार ठप्प असताना मात्र जिल्ह्याची आर्थिक वहिनी म्हणून गोकुळ संघाने सर्वांना विश्वासात घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे . जवळपास ८० कोटी रुपये जिल्ह्यातील उत्पादकांना संघाने फरक बील वाटप केले आहे. त्याहीपेक्षा ग्रामीण भागातील प्राथमिक दूध संस्थेने आपल्या नफ्यातून जास्तीत जास्त रक्कम बोनस व भेटवस्तू च्या रूपाने दूध उत्पादकांना वाटप केले आहे. या दोघांच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये दूध उत्पादकांची दिवाळी अत्यंत चांगली व गोड होण्यास मदत झाली आहे . असे पाटील यांनी सांगितले.
    चेअरमन सतिशकुमार चौगुले म्हणाले, संस्थेने काटकसरीने व्यवसाय करून दूध उत्पादकांना संघ व संस्थेच्या माध्यमातून सुमारे १७ लाख रुपयांचे फरक बिल (बोनस) म्हणून दूध उत्पादकांना वाटप केले आहे .संघाच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधेचा लाभ दूध उत्पादकांना मिळवून देण्यास संस्था नेहमी अग्रेसर राहिली आहे . किसान फार्मर्स पॅकेजच्या माध्यमातून सुमारे सव्वा पाच लाख रुपये इतकी आर्थिक मदत दूध उत्पादकांना मिळाली आहे.
     कार्यक्रमास व्हा चेअरमन नेताजी माने, संस्थापक चेअरमन बाळासाहेब थोरवत, बाळासो चौगुले, जयवंत चौगुले, आनंदराव पोवार, महादेव शिंदे, सुनिल सुतार, सुरेश कांबरे, सागर थोरवत ,शकील हजारी, महादेव चौगुले, सचिव आण्णासो पाटील, विलास घुगरे, सोमनाथ जंगम आदि उपस्थित होते. स्वागत संस्थेचे सचिव आण्णासाहेब पाटील यांनी केले ,प्रास्ताविक सतिश चौगुले यांनी केले. तर आभार संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब थोरवत यांनी मानले . 

error: Content is protected !!