कोरोना योद्ध्यांचे योगदान विसरता येणार नाही- बबन यादव ; चिपरीत शाहू आघाडीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

जयसिंगपुर / प्रतिनिधी
     मागील सहा महिन्यात गावागावांमध्ये कोरोना संसर्गाच्या विरोधात रात्रंदिवस जिवाची आणि परिवाराची पर्वा न करता जनतेची सेवा केलेल्या आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, महसूल व शिक्षण विभागाकडील कर्मचारी, पोलीस, तंटामुक्त व ग्राम दक्षता समिती, लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स या सर्व घटकांचे योगदान विसरता येणार नाही, कोरोना योद्धा म्हणून राजर्षी शाहू विकास आघाडी व सुदर्शन पाटील यांनी यांचा जो सत्कार केला तो स्तुत्य उपक्रम आहे असे उदगार चिपरीचे माजी सरपंच बबन यादव यांनी काढले.

     चिपरी येथे राजर्षी शाहू आघाडीच्या वतीने येथील मराठा मंडळ समाजाच्या हॉलमध्ये कोरोना योद्धा व कोरोना मुक्त रुग्णांचा सत्कार अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . राजर्षी शाहू आघाडीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच सुदर्शन पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना मागील सहा महिन्यात गावामध्ये झालेल्या कामाचा आढावा घेतला व कोरोना योद्ध्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले, यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जवळपास सर्व विभागातील मिळून 60 कोरोना योद्ध्यांचा व कोरोना मुक्त रुग्णांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, यावेळीअंगणवाडी सेविका राजश्री कांबळे यांनी बेटी बचाव अभियाना अंतर्गत उपस्थितांना शपथ दिली,
    यावेळी सत्कार मूर्तीनी मनोगत व्यक्त करताना राजर्षी शाहू आघाडी ने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आघाडीचे अध्यक्ष सुदर्शन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले,
   कार्यक्रमास माजी सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश रजपूत, शिवाजी बेडगे, तातोबा कोरे, सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष कांबळे, सुधीर लोहार, मुसा फकीर, बा.च.पाटील, हिंदुराव जगदाळे, राजू सूर्यवंशी, रावसाहेब शेळके, म्हाळू गावडे, निर्मला भानुसे, सौ. आळतेकर, ग्रामविकास अधिकारी विजयसिंह रजपूत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार माजी तंटामुक्त अध्यक्ष आनंदा पांडव यांनी मानले तर सूत्रसंचालन मंगेश मळे यांनी केले.

error: Content is protected !!