नवे पारगावात ‘बेटी पढाओ,बेटी बचाओ’ अभियान अंतर्गत जनजागृती…

नवेे पारगाव /प्रतिनिधी
      नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे जिल्हा एकात्मिक बाल विकास प्रकल्प व नवे पारगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधुन ‘बेटी पढाओ,बेटी बचाओ’ या अभियानांतर्गत मुलगी वाचवा, मुलगी शिकवा व स्त्री जन्माविषयी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी सरपंच प्रकाश देशमुख, उपसरपंच शुभदा पाटील, ग्रामविकास अधिकारी अंकुश गोरे, अंबप बिट अंगणवाडीच्या निरिक्षक शुभांगी बुवा यांची प्रमुख उपस्थिती होती.

       यावेळी गावातून मुलगी वाचवा,मुलगी शिकवा,स्ञी जनजागृतीच्या विविध बॅनरसह घोषणा देत गावातील मुख्य मार्गावरून सामाजिक अंतर राखत जनजागृती रॅली काढण्यात आली.
     यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी अंगणवाडी सेविका अनिता लोखंडे यानी महीला, किशोरवयीन मुलींसह उपस्थिताना मुलगी व स्त्री जन्माविषयी शपथविधी दिली.यावेळी सरपंच प्रकाश देशमुख म्हणाले,देशाच्या एकता व अखंडतेमध्ये महीलांचे महत्व हे महत्वाचे असुन मुलासोबतच मुलींच्या शिक्षणाबरोबरच सर्वांगिण विकासासाठी पालकानी सजग रहावे.
ग्रामविकास अधिकारी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अंगणवाडी सेविका निरिक्षक शुभांगी बुवा यांनी करताना बेटी पढाओ,बेटी बचाओ मोहिमेअंतर्गत एकात्मिक बाल-विकास प्रकल्पाच्या वतीने महीला-मुलींबाबतच्या आरोग्य विकसाच्या विविध योजना विशद केल्या.यावेळी मुलीना आज सर्वांगिण शिक्षण देण्याची जबाबदारी असलेचेही बुवा यांनी बोलताना सांगितले.
     यावेळी अंगणवाडी सेविका कांचन सोने, प्रज्ञा कांबळे, सुनिता कांबळे, अनिता लोखंडे, साधना कांबळे, मदतनीस संगीता लोखंडे, कल्पना तांबे, अनिता पांढरे, पुनम सोने, सुवर्णा पोवार, प्रणोती घाटगे यांच्यासह गावातील महीला,किशोवयीन मुलींची उपस्थिती होती. सुञसंचलन अंगणवाडी सेविका प्रज्ञा कांबळे यानी केले तर आभार
सुनीता कांबळे यांनी मानले.

error: Content is protected !!