हातकणंगले / प्रतिनिधी साजणी (ता. हातकणंगले) गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष , कुंथुगिरीचे मुख्य व्यवस्थापक डॉ. सुरेश मोघे यांना नवी दिल्ली येथील CWVE युनिव्हर्सिटी यांचेकडून PHD सामाजिक कार्यात (Social Work) अत्युच्च काम केलेबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल करणेत आली आहे . डॉक्टरेट (Doctor of philosophy ) पदवी प्रदान कार्यक्रम दिल्ली येथे उत्साहात संपन्न झाला.
लहानपणी घरची परिस्थिती नसल्याने कोणतीही शैक्षणिक डिग्री मिळवता आली नाही . परंतु आपले कर्तृत्व, निष्ठा ,अनुभव यातून यशाची चमकदार कामगिरी केल्याने त्यांना हे यश मिळाले आहे . त्यांचे परिसरातुन कौतुक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .