रुकडी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्थेची महत्वाची योजना म्हणजे वस्तु स्वरूपातील दिपावली भेट म्हणून दहा लिटर सूर्यफुल तेल आणि भेटवस्तु द्यावी. काही सभासदांकडून दिपावली भेट ऐवजी रोख रक्कमेच्या स्वरूपात रक्कम मिळावी . अशा प्रकारची मागणी सोशल मिडियावर व्हायरल केली जात आहे. त्याचा विचार न करता दरवर्षीप्रमाणे भेट वस्तू द्यावी. अशी मागणी निवेदनाव्दारे ‘कोजिमाशि’ इचलकरंजी शाखेचे शाखा व्यवस्थापक यांचेकडे हातकणंगले तालुक्यातील सभासदांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोजिमाशि’चे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाने सातत्याने दहा वर्षे दिपावली भेट दिलेली आहे . त्यात खंड पडू नये. पैशाला मोल नाही . भेट वस्तू अनमोल आहे. काही मुठभर सभासद इतर सभासदांमध्ये गैरसमज पसरवित आहेत. याची जाणीव आम्हाला आहे. इतर जिल्हा पतसंस्थेच्या कर्जाच्या व्याज दराचा विचार करता कोजिमाशिचा कर्जावरील व्याज दर हा १ टक्यांनी कमी आहे.नुकतेच सभासदांच्या चिरंतन ठेवीचा व्याजदर ११.५०% करून योग्यच निर्णय घेतला.वार्षिक सभा घेणेस शासनाची अद्याप मान्यता नाही . हे सर्वानाच माहिती आहे . तरीही लाभांश वाटप करणेसाठी संचालक मंडळाचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहेत . याची सभासदांना माहिती आहे. लवकरात लवकर आपण शासन मान्यता घेऊन दसरा दिवाळी काळात लाभांश वाटप करावे.चालूवर्षी सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव असून त्यामुळे अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. कोजिमाशि नेहमीच खंबीरपणे सभासदाच्या पाठीशी उभी राहत असते. सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असता. त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे दिपावली भेट म्हणून देत असलेले १० लिटर सूर्यफुल तेल आणि भेटवस्तु काही सभासदांकडून दिपावली भेट ऐवजी रोख रक्कमेच्या स्वरूपात रक्कम मिळावी . अशा प्रकारची मागणी सोशल मिडियावर व्हायरल केली जात आहे. त्याचा विचार न करता भेट वस्तू द्यावी. अशी विनंती सभासदांनी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर विविध शाळांनुसार सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहेत.