दिनविशेष – १३ एप्रिल

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

१९७१: भारतीय फुटबॉल खेळाडू कार्ल्टन चॅपमन यांचा जन्म.

१७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म.

१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. 

१९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.

१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.

१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

१९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.

२०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.

२००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. 

error: Content is protected !!