पवार व मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न …..

कोल्हापूर / प्रतिनिधी
        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. नविद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नाविद मुश्रीफ युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.


        या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी स्पर्धेचे विजेते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आले होते. यावेळी लहान गटात प्रथम क्रमांक प्रसाद काकडे (बारामती), द्वितिय क्रमांक माधुरी ननवरे (फलटण), तृतीय क्रमांक गायत्री शिंदे (सातारा), चौथा क्रमांक सानिका शेख (करनूर, कागल) , महाविद्यालयीन मध्यम गटात प्रथम क्रमांक हर्षवर्धन आलासे (जयसिंगपूर), द्वितिय क्रमांक अक्षय इळके (इचलकरंजी), तृतीय क्रमांक सौरभ पाटील (कौलगे, कागल), चौथा क्रमांक पूजा हिरपुरकर (अमरावती). खुला गटात प्रथम क्रमांक धनंजय झोंबाडे (पुणे), द्वितीय क्रमांक कैलास तुपे (बीड), तृतीय क्रमांक संजय खोचरे (भुदरगड) या सर्व विजेते स्पर्धकांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार संध्याताई कुपेकर, शहराध्यक्ष आर.के.पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने, गणी फरास, जिल्हा परिषद सदस्य युवराज (बापू ) पाटील, शिवाजी युनिव्हर्सिटीचे सिनेट सदस्य मधुकर पाटील, राजू लाटकर, आदिल फरास, महेंद्र चव्हाण, सूर्यकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी नगरसेवक – नगरसेविका, आजी-माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!