सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना विनम्र अभिवादन

वारणानगर / प्रतिनिधी
       वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर, रजिस्टार हरीश गायकवाड, प्रा.बी.डी. आभ्रंगे, भालचंद्र शेटे यांच्यासह सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

     दरम्यान श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संस्थांतर्गत सामुदायिक अभिवादन समारंभ प्रशासकीय अधिकारी प्रोफेसर डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते संकुलातील तात्यासाहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, डिप्लोमाचे प्राचार्य बी.व्ही.बिराजदार, एम. एस.के. डिजिटल चॅनलचे मनीष कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी असे सर्वांनी फुले वाहून अभिवादन केले.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत प्रबंधक बाळासाहेब लाडगाव कर, अधीक्षक हरीश गायकवाड भालचंद्र शेटे, तानाजी शिंदे व सहकारी प्राध्यापक व कर्मचारी.

error: Content is protected !!