शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना माणुसकी फौंडेशनचे निवेदन ;लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन

कोल्हापुर / प्रतिनिधी
    ‘शिवाजी विद्यापीठ ‘ मधील सर्वच क्षेत्रातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना आत्ताच्या कोरोनाच्या काळात जे पेपर झाले नाहीत. त्या परीक्षेला सर्वच विद्यार्थ्यांना पास केले जाईल . अशी बातमी समोर आली आहे. पण त्या परीक्षेचा निकाल पाहता तो निकाल आधीच्या गुणवत्तेवर लावला असल्याने, हजारो विद्यार्थी आधीच्या परीक्षेच्या गुणवत्तेमुळे नापास झाले आहेत. त्यांच्या गुणपत्रिकेवर नापास हा शेरा आलेला आहे. पण सांगितल्या प्रमाणे कोरोनाच्या काळात न झालेल्या परीक्षेला पास करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सोबत झालेल्या समक्ष बैठकीत केली होती.
   विद्यार्थ्यांच्या मागणीला यश देऊ असे आश्वासन ही शिक्षणमंत्री यांनी दिले होते. पण अजूनही विद्यापीठाने त्याबाबत कोणतेही रितसर परिपत्रक विद्यार्थ्यांना जाहीर केले नाही. तरी लवकरात लवकर विद्यापीठकडून कोरोनाच्या काळात न झालेल्या सर्वच क्षेत्रातील मुलांना पास केले जाईल . असे परिपत्रक जाहीर करावे . या मागणीचे निवेदन माणुसकी फौंडेशनच्या वतीने विद्यापीठचे नवनियुक्त कुलगुरू शिर्के यांना देण्यात आले.

    कुलगुरू शिर्के यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊ असा शब्द दिला. यावेळी माणुसकी फौंडेशनचे व विद्यार्थी बचाव कृती समितीचे प्रथमेश इंदुलकर, आकाश नरुटे, ऋषिकेश चांदणे, आनंदा इंगवले, इम्रान शेख, यासिन पेंढारी इतर सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!