शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे – प्रांतपाल सुहास कुलकर्णी ;रोटरीचे नेशन बिल्डर पुरस्कार शिक्षकांना प्रदान

हेरले / वार्ताहर
    शिक्षणाच्या नवीन प्रवाहामध्ये शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांच्यात सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.असे आवाहन रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल सुहास कुलकर्णी यांनी केले.
    रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित ‘नेशन बिल्डर पुरस्कार २०२०-२१’ वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत हा कार्यक्रम पार पडला.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित ‘नेशन बिल्डर पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या समवेत डॉ.सुहास कुलकर्णी सुर्यकांत पाटील (बुद्धीहाळकर),स्वप्निल मुधाळे .

    कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माध्यमिक शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक विकास समुद्रे, क्रीडा शिक्षक संदीप पाथरे, राहुल जाधव, सुलक्षना मुळे, सचिन यादव, सौ.दीपा बुकशेटे, शशिकांत सुतार आदींना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
    यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष सुर्यंकात पाटील (बुध्दीहाळकर) म्हणाले, शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहील्यास सुदृढ समाजाची निर्मिती होईल.शिक्षकांचे कार्य अनन्यसाधारण आहे. भारत बलशाली होण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे.
     यावेळी सचिन यादव व प्रि.इंदूमतीदेवी इंटरअॅक्ट क्लबच्या समन्वयक सुलोचना कोळी यांची मनोगते झाली.
     कार्यक्रमास रोटीरीयन्स प्रकाश जगदाळे,हर्षवर्धन भुरके,अवधूत भाटे, बदाम पाटील, नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय गाडवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचलन जिया मोमीन यांनी केले.आभार सेक्रेटरी स्वप्निल मुधाळे यांनी मानले.

error: Content is protected !!