गारगोटी /प्रतिनिधी
गारगोटी येथील एस. टी. स्टँडवर एका महिलेची पर्स कापून त्यातील दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये असा पाच लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबवले, याबाबत भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सौ शोभा मारुती पारळे (रा. खेडे मडीलगे, ता.आजरा, सध्या रा.विरार, मुंबई ) ही महिला विवाह समारंभासाठी गावी आली होती, ती आज मुंबईला परत जात होती, ही महिला गारगोटी येथे दुपारी सव्वा एक वाजता एस टी बसमधून उतरत असतांना एका ३५ ते ४० वर्षाच्या जाड काळ्या रंगाच्या अज्ञात महिलेने सौ. शोभा पारळे यांची पर्सची चेन तोडून त्यातील तीन तोळ्याचे गंठण,अडीच तोळे वजनाचा लक्ष्मीहार, दीड तोळे वजनाचा राणीहार,एक तोळे वजनाचा नेकलेस, अर्धा तोळे वजनाची ठुशी, व इतर असा दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रूपये पर्सची चेन कापून चोरले, याबाबत अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.