विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बांधकामास सर्वतोपरी सहकार्य करू – डॉ. पद्माराणी पाटील

हातकणंगले/ प्रतिनिधी
  जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बांधकामास सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांनी दिले. हेरले (ता. हातकणंगले)येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पायाभरणी सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

हेरले -विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील माजी सभापती राजेश पाटील व इत्तर मान्यवर

   यावेळी माजी सभापती राजेश पाटील व डॉ. पद्माराणी पाटील यांच्या हस्ते मंदिराचा पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास माजी उपसभापती अशोक मुंडे, पोलिस पाटील नयन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिणीस मुनीर जमादार, दीपक जाधव, ग्रामपंचायत सदस्य सतीश काशीद, अपर्णा भोसले, स्वरूपा पाटील, विजया घेवारी ग्रामस्थ उपस्थित होते. धार्मिक विधी जनार्दन कुलकर्णी यांनी केले

error: Content is protected !!