कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे ऐन दिवाळीच्या दिवशी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या तब्बल सत्तरा जणांवर कारवाई केली असून चार लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून दीपावली काळामध्ये जुगार खेळणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
अधिक माहिती अशी की , शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे यशवंत कॉलनीतील संजय पाटील यांच्या शेडमध्ये जुगार खेळत असल्याचे कुरुंदवाड पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 1464O/- रुपये रोख रक्कम , 90000/- हजार रुपयाचे मोबाइल हँडसेट 300000/- रुपयाच्या मोटरसायकली ,4000/- रुपयेची पत्त्याच्या पानाचे बॉक्स असा एकूण 408640/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत जुगार खेळणारे संतोष कासार (रा. माणकापुर) , भरत पाटील (रा. इचलकरंजी), अमर माने (रा. माणकापुर), आप्पासो खोत (रा. शिवनाकवाडी), कल्लू दानवाडे (रा. शिवनाकवाडी), तातोबा खाडे (रा. शिरदवाड), राहुल बेडकिहाळे (रा. माणकापुर), महेश कांबळे (रा. शिरदवाड), अविनाश बरगाले (रा. शिरदवाड) , रामचंद्र वाघे (रा. शिरदवाड), सर्जेराव छत्रे (रा. माणकापुर), कुबेर वाईकर (रा. माणकापुर), शिवाजी माने (रा. माणकापुर), वृषभ गलगले , सुशांत कांबळे (सदलगा ), सुशांत खोत (रा. इचलकरंजी) व प्रमोद पाटील (रा. इचलकरंजी) यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश मुंगशे करीत आहे.