तब्बल सोळा लाखाचे मोबाईल चोरीस , तपासात श्वान घुटमळले ; व्यापाऱ्यांमध्ये घबराट

इचलकरंजी / प्रतिनिधी
     इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील गायत्री शॉपी नावाच्या मोबाईल शॉपीचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल सोळा लाखाचा मुद्देमाल चोरून नेला . ही घटना मंगळवारी पहाटे घडली असून याबाबतची फिर्याद शॉपी मालक रवी जनार्दन हजारे (रा.कोरोची ता . हातकणंगले ) यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे . चोरीच्या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली असुन घबराट पसरली आहे .

     इचलकरंजी बस स्थानक परिसरात रवी हजारे यांचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे . त्यांच्या दुकानातून मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून वेगवेगळ्या कंपनीचे 107 मोबाईल चोरून नेले त्याची किंमत तब्बल 16 लाख 66 हजार रुपये आहे . चोरट्यांनी मोबाईल बॉक्स दुकानातच टाकून दिले असून बॉक्स मधील मोबाईल घेऊन गेले आहेत . शॉपीमध्ये दोन सीसीटीव्ही आहेत . पण त्यातील बाहेरचा सीसीटीव्ही बंद आहे , पण आतील सीसीटीव्ही चालू असल्याने घटना चित्रित झाली आहे . शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून श्वान पथकास पाचारण केले असता श्वान जागेवरच घुटमळले . तसेच तज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत . चोरीची घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाली असून आठ अज्ञात चोरटे असल्याचे सीसीटीव्हीत चित्रीत झाले आहे . पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत

error: Content is protected !!